15 परंतु जर अविश्वासी व्यक्ती वेगळी होऊ इच्छित असेल तर तसे होऊ द्या. अशा परिस्थितीत भाऊ किंवा बहीण बांधलेले नाही; कारण परमेश्वराने आपल्याला पाचारण केले आहे ते यासाठी की आपण शांतीने राहावे. 16 अहो पत्नींनो, तुमच्या पतींचे तारण तुमच्याद्वारे होईल किंवा नाही हे कसे समजावे? किंवा पतींनो तुमच्या पत्नीचे तारण तुमच्याद्वारे होईल किंवा नाही हे कसे समजावे?