आत्मशिस्तीची आवश्यकता
24 शर्यतीत प्रत्येकजण धावतो, परंतु फक्त एकाच व्यक्तीला बक्षीस मिळते हे तुम्हाला माहीत नाही का? अशा रीतीने धावा की ते बक्षीस तुम्हाला मिळेल. 25 जो कोणी क्रीडास्पर्धेत भाग घेतो, त्या प्रत्येकाला कडक रीतीने प्रशिक्षण घ्यावे लागते. ते विनाशी मुकुट मिळविण्यासाठी करतात, परंतु आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी तसे करतो. 26 म्हणून मी ध्येय नसलेल्या कोणा मनुष्यासारखा धावत नाही; मी केवळ मुष्टियुद्ध करीत नाही, म्हणजे हवेत मुष्टिप्रहार करत नाही. 27 मी एखाद्या क्रीडापटूप्रमाणे माझ्या शरीरावर ताबा मिळवितो व परिश्रम करून त्याला दास करून ठेवतो, जेणेकरून इतरांना उपदेश केल्यानंतर मी स्वतःच बक्षिसास अपात्र ठरणार नाही.