34 याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत;
त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.
35 यांचा धावा करून म्हणा, हे आमच्या परमेश्वरा, आमचे तारण करा;
परमेश्वरा, आम्हाला या देशातून सोडवून एकत्र करा,
जेणेकरून आम्ही तुमचे पवित्र नाव धन्यवादित करून,
तुमच्या स्तवनात गौरव मानावे.
36 इस्राएलचे परमेश्वर याहवेहची,
अनादिकालापासून अनंतकालापर्यंत स्तुती होवो.
मग सर्व लोकांनी म्हटले "आमेन! याहवेहची स्तुती होवो."