6 आणखी गथ येथे झालेल्या दुसर्या एका युद्धात प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता. 7 जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली, तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआचा पुत्र योनाथानने त्याला ठार केले.