Pular para o conteúdo
Publicidade

1 योहान 2:15-17

OMRCV Marathi Contemporary Version

जगावर प्रेम करू नये यासाठी

15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करतात तर त्यांच्यामध्ये पित्यासाठी प्रीती वसत नाही. 16 कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे, देहाची वासना, डोळ्याची वासना व जीवनाचा गर्व या सर्वगोष्टी पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. 17 जग आणि त्याच्या सर्व वासना नाहीशा होतील, परंतु जी व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करते, ती सदासर्वकाळ जगते.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही. 16 कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत. 17 जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्वकाळपर्यंत जगेल.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.