18 आपल्याला माहीत आहे की, जे कोणी परमेश्वरापासून जन्मले आहेत ते पाप करीत राहत नाहीत; जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांना परमेश्वर सुरक्षित ठेवतात आणि तो दुष्ट त्यांना अपाय करू शकत नाही. 19 आपल्याला हे माहीत आहे की, आपण परमेश्वराची लेकरे आहोत आणि संपूर्ण जग त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे.