7 वास्तविक ख्रिस्ताचे प्रेषित म्हणून आमचा अधिकार निश्चितपणे मिळविता आला असता.
जशी आई आपल्या लेकरांचे कोमलतेने पालनपोषण करते, त्याचप्रमाणे आम्हीही तुमच्याशी कोमलतेने व्यवहार केला. 8 तसेच आम्ही तुमची काळजी घेतली. आम्ही तुमच्यावर एवढी प्रीती केली की आम्ही आनंदाने केवळ परमेश्वराची शुभवार्ताच नव्हे तर आमचे स्वतःचे जीवनही देण्यास तयार होतो.