Pular para o conteúdo
Publicidade

1 थेस्सलनीकाकरांस 3:6-13

तीमथ्याचा उत्तेजनीय अहवाल

6 तीमथ्य तुमच्याकडून नुकताच आम्हाकडे परतला असून त्याने तुमचा विश्वास आणि प्रीती याबद्दल चांगली बातमी दिली आहे आणि आमच्याबद्दल तुम्हाला गोड आठवणी आहेत व तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही जसे उत्कंठित आहोत, तसेच आम्हाला भेटण्यासाठी तुम्हीही उत्कंठित आहात. 7 त्यामुळे, बंधू आणि भगिनींनो, आमच्या सर्व दुःखात व छळात तुमच्या विश्वासाद्वारे तुमच्याकडून आम्हाला उत्तेजन मिळाले आहे. 8 तुम्ही प्रभूमध्ये स्थिर उभे आहात म्हणून आम्ही खर्‍या अर्थाने जगतो. 9 परमेश्वराच्या समक्षतेत जो सर्व आनंद आम्हाला तुमच्यामुळे झाला आहे त्याबद्दल आम्ही तुमच्याबद्दल परमेश्वराचे पुरेसे आभार कसे मानावयाचे? 10 आम्ही तुमच्यासाठी रात्र आणि दिवस फार आग्रहाने प्रार्थना करतो की आम्ही तुम्हाला लवकरच भेटावे आणि तुमच्या विश्वासामध्ये जे काही उणे असेल ते पूर्ण करावे.

11 आता स्वतः आमचे परमेश्वर पिता आणि आपले प्रभू येशू ख्रिस्त यांनी आमचा तुम्हाकडे येण्याचा मार्ग सिद्ध करावा. 12 प्रभू असे करो की जशी आम्ही तुमच्यावर करतो तशी तुमची प्रीती वाढावी आणि एकमेकांसाठी ओसंडून वाहावी. 13 आपले प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जणांसह येतील, त्यावेळी आपल्या परमेश्वर पित्याच्या समक्षतेत तुम्ही दोषरहित आणि पवित्र असावे, म्हणून ते तुमची मने बळकट करोत.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.

1 Tessalonicenses
Ver todos os capítulos de 1 Tessalonicenses