शेवटच्या शुभेच्छा
11 शेवटी, बंधू आणि भगिनींनो, आनंद करा! मी सांगितले त्याकडे लक्ष पुरवा. परिपूर्ण होण्यासाठी झटा, एकचित्त व्हा, उत्तेजन द्या व शांतीने राहा आणि प्रीतीचा व शांतीचा परमेश्वर तुम्हाबरोबर असो.
12 एकमेकांना पवित्र चुंबनाने अभिवादन करा.
13 या ठिकाणी असणारे परमेश्वराचे सर्व लोक तुम्हाला शुभेच्छा पाठवित आहेत.
14 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाबरोबर असो.