Pular para o conteúdo
Publicidade

2 करिंथकरांस 13

अखेरचे इशारे

1 तुमच्या भेटीला येण्याची ही माझी तिसरी वेळ राहील. "प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित केले पाहिजे."13:1 अनु 19:15 2 मी तुमच्याबरोबर दुसर्‍या खेपेला तिथे असताना आधी इशारा दिलाच आहे. आणि आता मी अनुपस्थित असतानाही सांगतो: मी परत आलो तर ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्या सर्वांची गय करणार नाही 3 ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतात या पुराव्याची तुम्ही मागणी करीत आहात. ते तुम्हाविषयी अशक्त नाही, तर ते तुमच्याशी योग्य रीतीने वागण्यासाठी अशक्त नाही तर सामर्थी असे आहेत. 4 त्यांना अशक्तपणात क्रूसावर खिळले गेले, तरी परमेश्वराच्या शक्तीने ते जिवंत आहेत. त्यासारखेच आम्ही त्यांच्यामध्ये अशक्त आहोत, तरी परमेश्वराच्या शक्तीने तुमच्याशी योग्य रीतीने वागण्यासाठी जिवंत आहोत.

5 तुम्हीच स्वतःचे परीक्षण करा. तुम्ही निश्चित विश्वासात आहात की नाही; तुमची परीक्षा करून पाहा. ख्रिस्त येशू तुम्हामध्ये आहे हे तुम्हाला कळत नाही तर कदाचित तुम्ही परीक्षेत उतरला नाहीत? 6 या कसोटीत आम्ही अयशस्वी झालो नाही हे तुम्हाला आढळून येईल, असा विश्वास धरतो. 7 आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो की तुम्ही जे अयोग्य आहे ते करू नये केवळ आम्ही परीक्षेत उतरलो आहोत म्हणून नव्हे आणि जरी आम्ही उतरलो नाही असे दिसले तरी तुम्ही योग्य जे आहे ते करावे. 8 आपण सत्याविरूद्ध काही करू शकत नाही, परंतु सत्यासाठीच करू शकतो. 9 तुम्ही सबळ आहात पण आम्ही अशक्त आहोत यात आम्हाला आनंद आहे. आमची प्रार्थना हीच आहे की तुम्हाला पूर्णत्व प्राप्त व्हावे. 10 मी या गोष्टी माझ्या अनुपस्थित लिहितो ते या आशेने की, तिथे आल्यावर जो अधिकार प्रभूने मला दिला त्याचा कठीण रीतीने वापर करून तुम्हाला पाडण्यासाठी नव्हे तर तुमची वृद्धी करण्यासाठी करू.

शेवटच्या शुभेच्छा

11 शेवटी, बंधू आणि भगिनींनो, आनंद करा! मी सांगितले त्याकडे लक्ष पुरवा. परिपूर्ण होण्यासाठी झटा, एकचित्त व्हा, उत्तेजन द्या व शांतीने राहा आणि प्रीतीचा व शांतीचा परमेश्वर तुम्हाबरोबर असो.

12 एकमेकांना पवित्र चुंबनाने अभिवादन करा.

13 या ठिकाणी असणारे परमेश्वराचे सर्व लोक तुम्हाला शुभेच्छा पाठवित आहेत.

14 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाबरोबर असो.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.