Pular para o conteúdo
Publicidade

2 करिंथकरांस 6:14-17

OMRCV Marathi Contemporary Version

मूर्तिपूजेविरुद्ध इशारा

14 विश्वासहीन लोकांबरोबर संबंध जोडून सहभागी होऊ नका; कारण नीतिमत्व व दुष्टता यामध्ये साम्य आहे काय? किंवा प्रकाश व अंधकार यामध्ये काही भागीदारी आहे काय? 15 तसेच ख्रिस्त व सैतान यांच्यामध्ये मेळ कसा असेल? विश्वासणारा मनुष्य व विश्वासहीन मनुष्य यांच्यामध्ये साम्य आहे का? 16 आणि परमेश्वराचे मंदिर व मूर्ती, यांच्यामध्ये कसा मेळ बसणार? कारण आम्ही परमेश्वराचे मंदिर, जिवंत परमेश्वराचे घर आहोत आणि परमेश्वराने म्हटले आहे:

"मी त्यांच्यामध्ये राहीन

आणि त्यांच्यामध्ये चालेन;

मी त्यांचा परमेश्वर होईन

आणि ते माझे लोक होतील."6:16 लेवी 26:12; यिर्म 32:38; यहे 37:27

17 यास्तव,

"त्यांच्यामधून निघा

आणि त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा;

प्रभूने म्हटले आहे

त्यांच्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका,

म्हणजे मी तुमचे स्वागत करेन."6:17 यश 52:11; यहे 20:34, 41

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    14 विश्वास न ठेवणार्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार? 15 ख्रिस्ताची बलियालाशी एकवाक्यता कशी होणार? किंवा विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? 16 आणि देवाच्या निवासस्थानाचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे निवास्थान आहात कारण देवाने म्हणले आहे की,

    ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन;

    मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’

    17 आणि म्हणून

    ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या

    आणि वेगळे व्हा;

    अशुद्ध त्यास शिवू नका;

    म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.