15 आपल्या प्रभूची सहनशीलता ही तारणाचीच संधी आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौलाला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हाला असेच लिहिले आहे, हे तारणच आहे असे समजा. 16 या विषयाचे वर्णन करून तो त्याच्या सर्व पत्रात त्याच प्रकारे लिहितो. त्याच्या पत्रातील काही गोष्टी समजावयास कठीण अशा आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर धर्मशास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा या पत्राचाही करतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.