यहूदीयाचा राजा मनश्शेह
1 वयाच्या बाराव्या वर्षी मनश्शेह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात पंचावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबाह होते. 2 त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, याहवेहने इस्राएली लोकांतून काढून टाकलेल्या राष्ट्रांच्या अमंगळ प्रथांचे अनुसरण त्याने केले.