नामान कुष्ठरोगातून बरा होतो
1 नामान हा अरामाच्या राजाच्या सैन्याचा सेनापती होता. तो त्याच्या स्वामीच्या नजरेत एक थोर आणि अत्यंत आदरणीय होता, कारण याहवेहने त्याच्याद्वारे अरामाला विजय मिळवून दिला होता. तो एक पराक्रमी वीरपुरुष होता; परंतु त्याला कुष्ठरोग5:1 कुष्ठरोग कातडीच्या वेगवेगळ्या आजारासाठी हा शब्द वापरला जात असे. झाला होता.