5 मृत्यूच्या लाटांनी मला घेरले;
नाशाच्या प्रवाहांनी मला बुडवून टाकले.
6 मृतलोकाच्या दोर्यांनी मला सभोवती घेरले;
मृत्यूचे भय मला सामोरे आले,
7 "मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला;
मी माझ्या परमेश्वराचा धावा केला.
आणि त्यांनी आपल्या मंदिरातून माझी आरोळी ऐकली;
माझा धावा त्यांच्या कानी पडला.