3 कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक शुद्ध शिक्षण स्वीकारणार नाहीत. त्याऐवजी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याभोवती असंख्य शिक्षक एकत्रित करतील जे त्यांच्या कानाची खाज जिरविणारे उपदेश देतील. 4 ते सत्यापासून आपले कान फिरवतील आणि काल्पनिक कथांकडे वळतील.