10 आम्ही तुम्हाजवळ होतो, तेव्हाही तुम्हाला हाच नियम दिला होता: "जो कोणी काम करू इच्छित नाही, त्याने खाऊ नये."
11 तुमच्यापैकी काहींची जीवनशैली आळशी आहे आणि काही लोक व्यत्यय आणणारे व इतरांच्या कामात लुडबुड करतात असे आम्ही ऐकतो. 12 अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विनंती नव्हे, आज्ञा करतो की त्यांनी शांत व्हावे आणि आपल्या अन्नासाठी श्रम करावे.