सार्दीस येथील मंडळीस
1 "सार्दीस येथील मंडळीच्या देवदूताला लिही:
ज्यांच्याजवळ परमेश्वराचे सात आत्मे व सात तारे आहेत, ते असे म्हणतात:
तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत, तुम्ही जिवंत आहात असे तुमच्याविषयी मत आहे, पण तुम्ही मेलेले आहात. 2 जागृत व्हा! जे उरलेले आहेत व मरणाच्या पंथास लागले आहे त्यांना बळकट करा, कारण तुमची कृत्ये माझ्या परमेश्वराच्या दृष्टीने मला परिपूर्ण अशी आढळली नाहीत.