Pular para o conteúdo
Publicidade

प्रकटीकरण 3:15-17,20

OMRCV Marathi Contemporary Version

15 तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. तुम्ही थंड नाही व उष्ण नाही. तुम्ही थंड किंवा उष्ण असता तर बरे झाले असते! 16 पण तुम्ही कोमट आहात, म्हणजे उष्ण नाही आणि थंडही नाही; म्हणून मी तुम्हाला माझ्या मुखातून बाहेर ओकून टाकीन. 17 तुम्ही म्हणता, ‘मी श्रीमंत आहे; हवे ते धन मिळविले आहे; मला कशाचीही उणीव नाही’ पण तुम्ही कष्टी, दीन, दरिद्री, आंधळे व नग्न आहात, हे तुम्हाला समजत नाही.

20 पाहा! मी दाराशी उभा राहून, दार ठोठावीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, तर मी आत येईन; मी त्याच्याबरोबर भोजन करेन आणि तो माझ्याबरोबर भोजन करेल.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    15 मला तुझी कामे माहीत आहेत, ती अशी की, तू थंड नाहीस व गरमही नाहीस. तू थंड किंवा गरम असतास तर बरे झाले असते. 16 पण, तू तसा नाहीस, कोमट आहेस, तू थंड नाहीस किंवा गरम नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. 17 तू म्हणतो मी सधन आहे, मी संपत्ती मिळविली आहे, आणि मला कशाची गरज नाही, पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही.

    20 पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करेन व तोसुध्दा माझ्याबरोबर भोजन करेल.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.