ग्रंथपटाची गुंडाळी आणि कोकरा
1 जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेली ग्रंथपटाची गुंडाळी मी पाहिली. ती गुंडाळी सात शिक्के मारून बंद केली होती. 2 एक बलवान देवदूत मोठ्याने घोषणा करीत होता: "हे शिक्के फोडून, या ग्रंथपटाची गुंडाळी उघडावयास पात्र असा कोणी आहे का?"