12 मी पाहत असताना त्याने सहावा शिक्का फोडला, तेव्हा एक प्रचंड भूमिकंप झाला. सूर्य शेळ्याच्या केसांपासून तयार केलेल्या गोणपाटासारखा काळा झाला; चंद्र रक्तासारखा लाल झाला. 13 अंजिराच्या वृक्षांवरील कच्ची फळे एखाद्या प्रचंड वादळाने गळून पडतात, तसे आभाळातील तारे भूमीवर गळून पडतांना मला दिसले.
Publicidade