एक लाख चव्वेचाळीस हजारांवर शिक्कामोर्तब
1 त्यानंतर पृथ्वीच्या चारही कोपर्यांवर चार देवदूत उभे राहिलेले मी पाहिले. पृथ्वीवरील भूमी, समुद्र किंवा कोणताही वृक्ष, यावर वाहू नये म्हणून ते त्या चारही वार्यांना थोपवून धरीत होते. 2 मग दुसरा देवदूत पूर्वेच्या दिशेने हातात जिवंत परमेश्वराचा शिक्का घेऊन येताना मी पाहिला. पृथ्वीला व समुद्राला इजा करण्याचे काम ज्या चार देवदूतांवर सोपविले होते, त्या चार देवदूतांना तो ओरडून म्हणाला, 3 "आम्ही परमेश्वराच्या सेवकांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का मारीपर्यंत पृथ्वी, समुद्र किंवा वृक्ष यांना काहीही इजा करू नका." 4 ज्या लोकांवर हा शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली: ते इस्राएलच्या सर्व बारा वंशांमधून 1,44,000 लोक होते.
5 यहूदाह वंशातून 12,000;
रऊबेन वंशातून 12,000;
गाद वंशातून 12,000;
6 आशेर वंशातून 12,000;
नफताली वंशातून 12,000;
मनश्शेह वंशातून 12,000;
7 शिमोन वंशातून 12,000;
लेवी वंशातून 12,000;
इस्साखार वंशातून 12,000;
8 जबुलून वंशातून 12,000;
योसेफ वंशातून 12,000;
बन्यामीन वंशातून 12,000.