16 त्यांना पुन्हा कधी भूक,
किंवा तहान लागणार नाही;
त्यांना सूर्याचा ताप,7:16 यश 49:10
किंवा दाहक उष्णता बाधणार नाही.
17 कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा
त्यांचा मेंढपाळ होईल,
‘ते त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झर्याजवळ नेईल,’
‘आणि परमेश्वर त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकतील.’7:17 यश 25:8"