Pular para o conteúdo
Publicidade

प्रेषित 12:2,5,12-16

2 त्याने योहानाचा भाऊ याकोबाचा तलवारीने वध करविला.

5 पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले होते, परंतु मंडळी त्याच्यासाठी परमेश्वराकडे एकाग्रतेने प्रार्थना करत होती.

12 हे त्याला स्पष्टपणे समजल्यानंतर, योहान ज्याला मार्क असेही म्हणतात त्याची आई मरीयाच्या घरी गेला. तिथे अनेक लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. 13 त्याने अंगणाचा दरवाजा ठोठावला आणि रुदा नावाची एक दासी दार उघडण्यासाठी आली. 14 तिने पेत्राचा आवाज ओळखला, तेव्हा तिला एवढा आनंद झाला की दरवाजा न उघडता ती पुन्हा आत धावत गेली आणि, "पेत्र दारात आहे!" असे तिने सांगितले.

15 ते तिला म्हणाले, "तुझे मन ठिकाण्यावर नाही," परंतु ती आग्रहाने सांगू लागली, तेव्हा ते म्हणाले, "तो त्याचा देवदूत असावा."

16 परंतु पेत्र ठोठावीत राहिला आणि जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला व त्याला पाहिले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.