14 त्या ऐकणार्या स्त्रियांमध्ये थुवतीरा शहराची लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती जांभळ्या वस्त्रांचा व्यवसाय करीत असे, ती परमेश्वराची उपासना करणारी होती. पौलाच्या संदेशाचा स्वीकार करण्यासाठी प्रभूने तिचे हृदय उघडले. 15 मग तिचा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचा बाप्तिस्मा झाला व तिने आम्हाला तिच्या घरी बोलाविले. ती म्हणाली, "मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे, असे जर तुम्ही मान्य करीत असाल तर, या आणि माझ्या घरी राहा." तिच्या आग्रहामुळे आम्हाला ते मान्य करावे लागले.