पवित्र आत्मा पन्नासाव्या दिवशी उतरतो
1 जेव्हा पेंटेकॉस्टचा2:1 पेन्टेकॉस्ट वल्हांडण सण (निर्ग 12:1-17; लेवी 23:15-22) झाल्यानंतरचा पन्नासावा दिवस. इकडे, येशू ख्रिस्तांना क्रूसावर दिल्यानंतरचा पन्नासावा दिवस दिवस आला, त्यावेळी ते सर्व एका ठिकाणी जमले होते. 4 तिथे उपस्थितीत असलेले सगळे जण पवित्र आत्म्याने भरले आणि आत्म्याने हे करण्यास त्यांना समर्थ केल्यामुळे ते वेगवेगळ्या भाषेत2:4 किंवा जिभा 11 व्या वचनातही बोलू लागले.