Pular para o conteúdo
Publicidade

प्रेषित 2:1-4

OMRCV Marathi Contemporary Version

पवित्र आत्मा पन्नासाव्या दिवशी उतरतो

1 जेव्हा पेंटेकॉस्टचा2:1 पेन्टेकॉस्ट वल्हांडण सण (निर्ग 12:1-17; लेवी 23:15-22) झाल्यानंतरचा पन्नासावा दिवस. इकडे, येशू ख्रिस्तांना क्रूसावर दिल्यानंतरचा पन्नासावा दिवस दिवस आला, त्यावेळी ते सर्व एका ठिकाणी जमले होते. 2 एकाएकी स्वर्गातून प्रचंड सोसाट्याच्या वार्‍यासारखा आवाज आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर त्याने भरले. 3 त्यावेळी अग्नीच्या जिभांसारख्या दिसणार्‍या जिभा वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर एकएक अशा स्थिरावताना त्यांना दिसल्या. 4 तिथे उपस्थितीत असलेले सगळे जण पवित्र आत्म्याने भरले आणि आत्म्याने हे करण्यास त्यांना समर्थ केल्यामुळे ते वेगवेगळ्या भाषेत2:4 किंवा जिभा 11 व्या वचनातही बोलू लागले.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    1 नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना. 2 अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले. 3 आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीभांसारख्या जीभा त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. 4 तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.