पवित्र आत्मा पन्नासाव्या दिवशी उतरतो
1 जेव्हा पेंटेकॉस्टचा2:1 पेन्टेकॉस्ट वल्हांडण सण (निर्ग 12:1-17; लेवी 23:15-22) झाल्यानंतरचा पन्नासावा दिवस. इकडे, येशू ख्रिस्तांना क्रूसावर दिल्यानंतरचा पन्नासावा दिवस दिवस आला, त्यावेळी ते सर्व एका ठिकाणी जमले होते. 2 एकाएकी स्वर्गातून प्रचंड सोसाट्याच्या वार्यासारखा आवाज आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर त्याने भरले. 3 त्यावेळी अग्नीच्या जिभांसारख्या दिसणार्या जिभा वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर एकएक अशा स्थिरावताना त्यांना दिसल्या. 4 तिथे उपस्थितीत असलेले सगळे जण पवित्र आत्म्याने भरले आणि आत्म्याने हे करण्यास त्यांना समर्थ केल्यामुळे ते वेगवेगळ्या भाषेत2:4 किंवा जिभा 11 व्या वचनातही बोलू लागले.
5 त्यावेळेस आकाशाखालील प्रत्येक देशामधून आलेले भक्तिमान यहूदी यरुशलेममध्ये राहत होते.