42 म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे पाठ फिरवून त्यांना आकाशातील सूर्य, चंद्र व ताऱ्यांची पूजा करू दिली. संदेष्ट्याच्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे:
" ‘अहो इस्राएली लोकहो, रानात असताना
चाळीस वर्षे तुम्ही मला अर्पणे व यज्ञे आणली काय?
43 तुम्ही मोलेख दैवताचा मंडप
आणि शक्कुथ व तार्यांचे दैवत रेफान,
उपासना करण्यासाठी या मूर्ती तुम्ही घडविल्या.
म्हणून मी तुम्हाला बाबेलच्या पलीकडे बंदिवासात पाठवेन.’7:43 आमो 5:25-27