15 ख्रिस्ताची शांती, तुमच्या अंतःकरणात राज्य करो; कारण एकाच शरीराचे अवयव म्हणून तुम्हीही या शांतीसाठी बोलावलेले आहात. तुम्ही कृतज्ञ राहा. 16 स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते, यांच्याद्वारे कृतज्ञ अंतःकरणातून परमेश्वराला गाणी गाऊन एकमेकांना पूर्ण सज्ञानाने शिकविताना आणि बोध देताना ख्रिस्ताचा संदेश तुम्हामध्ये विपुलतेने राहो. 17 आणि जी काही कृती तुम्ही कराल व जे बोलाल, ते सर्व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर जो पिता त्यांची उपकारस्तुती करा.
Publicidade
Publicidade