6 तू मला आपल्या हृदयावर मोहर लावल्याप्रमाणे ठेव,
मुद्रेप्रमाणे आपल्या भुजांवर मला ठेव;
कारण मृत्यूप्रमाणेच प्रीती प्रबळ आहे,
तिचा हेवा8:6 किंवा उत्साह कबरेप्रमाणे आहे.
तिचे उद्रेक अग्निज्वालेप्रमाणे उसळतात,
ते खरोखर आगीचे लोळच8:6 किंवा याहवेहच्या अग्नीसारखा असतात.
7 प्रेमाचा अग्नी विपुल जलाशयांनी विझत नाही;
नद्यांमध्ये महापूर आला तरी ती बुडत नाही.
एखाद्याने आपल्या घरातील
संपूर्ण संपत्ती देऊ केली तरी
प्रेमापुढे ती अगदी तुच्छ होय.
मित्र