16 आक्रमण करणारा त्याला वाटेल तसे तो करेल; त्याच्या विरोधात कोणीही उभे राहू शकणार नाही. तो सुंदर देशात स्वतःची स्थापना करेल आणि त्याचा नाश करण्याची शक्ती त्याच्याकडे असेल. 17 तो आपल्या राज्याच्या सर्व सामर्थ्याने येण्याचा निर्धार करेल आणि तो दक्षिणेच्या राजाबरोबर करार करेल. त्याचे राज्य जिंकण्यासाठी तो आपली एक मुलगी विवाहात देईल, परंतु त्याची ही योजना यशस्वी होणार नाही वा त्याला काही मदत मिळणार नाही.
Publicidade