5 "दक्षिणेचा राजा सामर्थ्यशाली होईल, परंतु त्याच्या सेनापतींपैकी एक त्याच्यापेक्षाही बलाढ्य होईल आणि तो स्वतःच्या राज्यावर बलशाली होऊन राज्य करेल. 6 काही वर्षानंतर ते एकमेकांशी सलोखा करतील. दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे तह करण्यासाठी जाईल, परंतु तिच्याकडे सामर्थ्य राहणार नाही आणि तो व त्याची शक्ती11:6 किंवा संतती टिकणार नाही. त्या दिवसांत, शाही रक्षकांसह आणि तिचे वडील आणि मदतनीस तिच्यासोबत विश्वासघात करतील.
Publicidade