2 परमोच्च परमेश्वराने मला जी चिन्हे व चमत्कार दाखविले ते तुम्ही सर्वांना सांगण्यात मला आनंद होत आहे.
3 किती महान त्यांनी प्रकट केलेली चिन्हे,
किती थोर त्यांनी केलेले चमत्कार!
त्यांचे राज्य सदासर्वकाळचे आहे;
त्यांचे प्रभुत्व पिढ्यान् पिढ्या राहणारे आहेत.