9 "जसे मी पाहिले,
"सिंहासने मांडली गेली
आणि प्राचीन पुरुष आपल्या आसनावर बसला आहे.
त्याची वस्त्रे हिमासारखी शुभ्र होती;
त्याच्या मस्तकावरील केस लोकरीप्रमाणे पांढरे होते.
त्याचे सिंहासन अग्निज्वालायुक्त होते,
आणि त्याच्या सिंहासनाची चाके प्रज्वलित केलेल्या अग्नीप्रमाणे होती.