46 तेव्हा तो त्यांना म्हणाला: "आज मी ज्या नियमशास्त्रामधील आज्ञा तुमच्यापुढे जाहीर केल्या आहेत, त्याला हृदयात साठवून ठेवा आणि तुमच्या मुलाबाळांना काळजीपूर्वक रीतीने त्यांचे पालन करण्यास शिकवा. 47 कारण हे केवळ पोकळ शब्द नाहीत—तर ते तुमचे जीवन आहे. त्याद्वारे यार्देनेच्या पलीकडे असलेला जो देश तुम्ही ताब्यात घेणार आहात, त्या देशात तुम्ही दीर्घकाल जगाल."
Publicidade