4 हे इस्राएला ऐक: याहवेह आपले परमेश्वर एकच याहवेह आहेत. 5 याहवेह तुमच्या परमेश्वरावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा. 6 या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला देणार आहे, त्या तुमच्या अंतःकरणात सदैव असाव्या. 7 त्या तुमच्या मुलांवर बिंबवा. घरी बसले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा. 8 त्या तुम्ही आपल्या हातावर चिन्ह म्हणून बांधून ठेवा आणि आपल्या कपाळपट्टीवर बांधा. 9 त्या तुमच्या घरातील दाराच्या चौकटीवर व तुमच्या फाटकांवर लिहा.
20 भविष्यात जेव्हा तुमचा पुत्र तुम्हाला विचारेल, "याहवेह आपल्या परमेश्वराने या आज्ञा, ही बोधवचने, विधी व नियम तुम्हाला दिले आहेत, त्यांचा अर्थ काय?" 21 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा: "आम्ही इजिप्त देशात फारोहचे गुलाम होतो, परंतु याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले. 22 आमच्या नजरेसमोर याहवेहने इजिप्त देश, फारोह राजा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाविरुद्ध—महान व भयावह—चिन्हे दाखविली व चमत्कार केले. 23 त्यांनी आम्हाला इजिप्तमधून यासाठी बाहेर आणले की, आमच्या पूर्वजांना जो देश देण्याचे त्यांनी शपथपूर्वक वचन दिले होते, त्या देशात आम्हाला आणावे. 24 याहवेहने आम्हाला सर्व नियम पाळण्याची आज्ञा दिली आणि याहवेह आपल्या परमेश्वराचे भय बाळगावे, जेणेकरून आपले निरंतर कल्याण व्हावे आणि स्वतःस जिवंत राखावे, जसे आजवर आहोत. 25 आणि जर आपण याहवेह आपल्या परमेश्वरासमोर दिलेल्या आज्ञेप्रमाणे या सर्व नियमांचे काळजीपूर्वक पालन केले, तर ते आपले नीतिमत्व असेल."