9 पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी बाबेल सोडले, पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी ते यरुशलेमला पोहोचले, कारण परमेश्वराचा वरदहस्त त्यांच्यावर होता. 10 कारण एज्रा याहवेहच्या नियमांचा अभ्यास करण्यास, ते पाळण्यास, व ते नियम इस्राएली लोकांना शिकविण्यासाठी समर्पित होता.