मंडळीमध्ये ऐक्य व परिपक्वता
1 प्रभूसाठी बंदिवान म्हणून, मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो, की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे जीवन जगावे. 2 पूर्ण नम्रतेने आणि सौम्यतेने; सहनशीलतेने, प्रीतीने एकमेकांचे सहन करा. 3 शांतीच्या बंधनात व पवित्र आत्म्याद्वारे ऐक्य टिकविण्यास झटावे. 4 जसे एक शरीर व एक आत्मा, तसेच आपल्याला एकाच गौरवी आशेसाठी पाचारण करण्यात आले होते. 5 एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा; 6 एकच परमेश्वर असून ते सर्वांचे पिता आहेत. तेच सर्वांवर, सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहेत.
7 तरी आपल्यापैकी प्रत्येकाला, ख्रिस्ताने नेमल्याप्रमाणे कृपा देण्यात आली आहे. 8 यामुळे असे4:8 किंवा परमेश्वराने म्हटले आहे:
"जेव्हा त्यांनी उच्चस्थानी आरोहण केले,
त्यांनी अनेक बंदिवान नेले
आणि त्यांच्या लोकांना दाने दिली."4:8 स्तोत्र 68:18
9 "त्यांचे आरोहण झाले" याचा अर्थ काय? की ते खाली पृथ्वीच्या अधोभागात उतरले होते. 10 जे अधोभागात उतरले त्यांनी पूर्ण सृष्टी भरून जाण्याच्या उद्देशाने स्वर्गाच्या उच्च स्थानापर्यंत सन्मानाने आरोहण केले. 11 म्हणून ख्रिस्ताने स्वतः मंडळीला काही प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक म्हणून दिले, 12 हे यासाठी की त्यांच्या लोकांना सेवेच्या कार्यात सिद्ध करून ख्रिस्ताचे शरीर सुसज्ज व्हावे.