19 आत्म्याने प्रेरित स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते गाऊन एकमेकांशी बोला. भजने गाऊन व संगीताद्वारे तुमच्या मनापासून प्रभूची स्तुती करा. 20 आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आपले परमेश्वर आणि पिता यांचे प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी उपकार माना.
ख्रिस्ती कुटुंबांसाठी सूचना
21 ख्रिस्ताबद्दल असलेल्या आदरामुळे एकमेकांच्या अधीन राहा.