25 पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे, ज्याप्रमाणे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती करून स्वतःस तिच्यासाठी अर्पण केले, 26 जेणेकरून मंडळीला वचनरुपी पाण्याने धुवून शुद्ध करून तिला पवित्र करावे; 27 आणि त्याने ती मंडळी गौरवी, डाग किंवा सुरकुती किंवा दोषरहित अशी आपणाला सादर करावी, ती पवित्र आणि निष्कलंक असावी.