Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 18:13,14,17,18,21,22,24

13 दुसर्‍या दिवशी मोशे इस्राएली लोकांचा न्याय करावयाला त्याच्या आसनावर बसला आणि लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्याभोवती उभे राहिले. 14 जेव्हा मोशे लोकांसाठी जे सर्व करीत होता ते त्याच्या सासर्‍याने पाहिले, तो म्हणाला, "हे तू लोकांसाठी काय करीत आहेस? तू एकटाच न्यायाधीश म्हणून का बसतोस व ते सर्व लोक दिवसभर तुझ्याभोवती उभे असतात?"

17 मोशेच्या सासर्‍याने उत्तर दिले, "तू जे करतोस ते बरोबर नाही. 18 तू व हे लोक जे तुझ्याकडे येतात, सर्वजण थकून जाल. हे काम तुझ्यासाठी खूप जड आहे; तू एकट्यानेच ते करणे तुला जमणार नाही. 21 पण या सर्व लोकांमधून सक्षम असे लोक—जे परमेश्वराचे भय बाळगणारे, विश्वसनीय, व अन्यायाच्या लाभाचा द्वेष करणारे असतील—ते निवडून घे; त्यांची हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर आणि दहांवर अधिकारी म्हणून नेमणूक कर. 22 त्यांनी सर्व समयी लोकांचे न्यायाधीश म्हणून असावे, परंतु प्रत्येक अवघड वाद तुझ्याकडे आणावा; आणि सोपे वाद त्यांच्या अधिकार्‍यांनी सोडवावेत. त्यामुळे तुझे ओझे हलके होईल, कारण ते तुझ्याबरोबर तुझा भार वाहतील.

24 मोशेने आपल्या सासर्‍याचे ऐकून सर्वकाही त्याने सांगितल्याप्रमाणे केले.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.