5 फारोहची कन्या नाईल नदीवर स्नान करण्यासाठी गेली व तिच्या दासी नदीच्या कडेने चालत होत्या. तिने लव्हाळ्याजवळ एक टोपली पाहिली; तेव्हा ती टोपली आणण्यासाठी तिने आपल्या एका दासीला पाठविले.
10 पुढे बाळ मोठा झाल्यावर तिने त्याला फारोहच्या कन्येकडे आणले आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे2:10 मोशे अर्थात् बाहेर काढलेला असे ठेवले, कारण ती म्हणाली, "मी त्याला पाण्यातून बाहेर काढले."