5 फारोहची कन्या नाईल नदीवर स्नान करण्यासाठी गेली व तिच्या दासी नदीच्या कडेने चालत होत्या. तिने लव्हाळ्याजवळ एक टोपली पाहिली; तेव्हा ती टोपली आणण्यासाठी तिने आपल्या एका दासीला पाठविले. 6 तिने ती टोपली उघडली आणि त्यात एक बाळ रडत असल्याचे तिला दिसून आले. तिला त्याचा कळवळा आला. "हे बालक इब्री आहे," ती म्हणाली.
7 तेवढ्यात त्या बाळाची बहीण फारोहच्या राजकन्येला म्हणाली, "या बाळाला दूध पाजण्यासाठी एखादी इब्री दाई मी तुमच्यासाठी शोधून आणू का?"
8 "होय, जा," फारोहची कन्या तिला म्हणाली. त्या मुलीने जाऊन बाळाच्या आईला आणले. 9 फारोहची कन्या तिला म्हणाली, "या बाळाला घेऊन जा आणि माझ्यासाठी त्याला दूध पाज; याचे वेतन मी तुला देईन." ती बाई त्या बाळाला आपल्या घरी घेऊन गेली व तिने त्याचे संगोपन केले.