31 "तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत23:31 अर्थात् भूमध्य समुद्रापर्यंत व वाळवंटापासून फरात23:31 फरात ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस म्हणून ओळखले जाते नदीपर्यंत मी तुमची सीमा स्थापित करेन. त्या देशात राहणारे लोक मी तुमच्या हाती देईन आणि तुम्ही त्यांना आपल्या पुढून घालवून टाकाल. 32 त्यांच्याशी किंवा त्यांच्या दैवतांशी करार करू नये.
Publicidade