Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 25:10,16-18,21

OMRCV Marathi Contemporary Version

कराराचा कोश

10 "त्यांनी बाभळीच्या लाकडाचा एक कोश तयार करावा—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच.25:10 म्हणजे 110 सें.मी. लांब, 68 सें.मी. रुंद व उंच 16 मग कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार, त्या तू कोशाच्या आत ठेवाव्यात.

17 "प्रायश्चिताचे झाकण शुद्ध सोन्याचे बनवावे—ते अडीच हात लांब व दीड हात रुंद असावे. 18 मग झाकणाच्या टोकांना घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब करून ठेवावेत. 21 हे प्रायश्चिताचे झाकण कोशाच्या वर ठेवावे आणि कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार त्या कोशाच्या आत ठेवाव्यात.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    10 "बाभळीच्या लाकडाची एक पेटी तयार करावी; त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात व उंची दीड हात असावी. 16 देव म्हणाला, मी तुला साक्षपट देईन तोही त्या कोशात ठेवावा. 17 मग शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावे; त्याची लांबी अडीच हात, रूंदी दीड हात असावी; 18 मग सोन्याचे घडीव काम करून दोन करुब करून ते दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत. 21 दयासन कोशावर ठेवावे. मी तुला जो साक्षपट देईन तो तू त्या कोशात ठेवावा;

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.