Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 27:1-8

होमवेदी

1 "बाभळीच्या लाकडाची वेदी तयार करावी, ती तीन हात उंच, पाच हात लांब व पाच हात रुंद27:1 अंदाजे 1.4 मीटर उंच, 2.3 मीटर लांब व रुंद असून ती चौकोनी असावी. 2 तिच्या चार कोपर्‍यांना प्रत्येकी एक शिंग बनवावे, शिंगे व वेदी अखंड असावी. वेदीला कास्याचे आवरण द्यावे. 3 वेदीवरील सर्व पात्रे, म्हणजेच राख उचलून नेण्याची भांडे, फावडे, शिंपडण्याचे भांडे, मांसाचे काटे आणि अग्निपात्रे कास्याचे असावीत. 4 तिच्यासाठी कास्याची जाळी तयार करावी आणि जाळीच्या चारही बाजूला कास्याच्या चार कड्या तयार कराव्या. 5 वेदीच्या काठाखाली ती अशाप्रकारे ठेवावी की ती वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत यावी. 6 वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे तयार करून त्यांना कास्याचे आवरण द्यावे. 7 दांडे कड्यात असे घालावेत की, वेदी वाहून नेताना ते तिच्या दोन बाजूंनी असतील. 8 फळ्या लावून वेदी आतून पोकळ बनवावी. ती तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणेच बनवावी."

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.