निवासमंडपाचे अंगण
9 "निवासमंडपासाठी अंगण बनवावे. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात27:9 अंदाजे 45 मीटर लांब असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे असावेत, 10 आणि वीस खांब व वीस कास्याच्या बैठका बनवाव्या, खांबावर चांदीच्या कड्या व पट्ट्या असाव्या. 11 उत्तरेकडील बाजू सुद्धा शंभर हात लांब असून तिलाही पडदे आणि वीस खांब व कास्याच्या वीस बैठका बनवाव्या, खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या असाव्या.
12 "अंगणाच्या पश्चिमेकडील बाजू पन्नास हात27:12 अंदाजे 23 मीटर रुंदीची असावी व त्यासाठी पडदे, व दहा खांब व दहा बैठका असाव्या. 13 सूर्योदयाकडील पूर्वेकडील अंगण सुद्धा पन्नास हात रुंद असावे. 14 प्रवेशद्वाराच्या एका बाजूस पंधरा हात27:14 अंदाजे 7 मीटर लांबीचा पडदा आणि तीन खांब व तीन बैठका असाव्या. 15 आणि दुसर्या बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे, तीन खांब व तीन बैठका असाव्या.
16 "अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी, निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व रेशमी तागाचा, वीस हात27:16 अंदाजे 9 मीटर लांबीचा पडदा असावा; त्यावर भरतकाम केलेले असावे; त्यात चार खांब व चार बैठका असाव्या. 17 अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व खांबांना चांदीच्या पट्ट्या, कड्या व कास्याच्या बैठकी असाव्या. 18 अंगणाची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पाच हात उंचीचे पडदे आणि कास्याच्या बैठकी असाव्या.