Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 30:1,6-8,10

OMRCV Marathi Contemporary Version

धूपवेदी

1 "धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार करावी. 6 कराराच्या कोशासमोर लावलेल्या पडद्याच्या बाहेरच्या बाजूस, प्रायश्चिताचे झाकण जे कराराच्या नियमाच्या पाटींवर आहे; तिथे वेदी ठेवावी; तिथेच मी तुला भेटत जाईन.

7 "रोज सकाळी जेव्हा अहरोन दिव्याची तयारी करेल, त्यावेळी त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा. 8 पुन्हा सायंकाळी दिवे लावायला तो येईल तेव्हा त्याने धूप जाळावा म्हणजे याहवेहसमोर नित्याने येणार्‍या पिढ्यांपर्यंत धूप जळत असावा. 10 अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगांवर प्रायश्चित करावे. हे वार्षिक प्रायश्चित येणार्‍या पिढ्यांपर्यंत पापार्पणाच्या रक्ताने करावे. हे याहवेहसाठी परमपवित्र आहे."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    1 तू धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी कर. 6 वेदी अंतरपटासमोर ठेवावी; आज्ञापटाचा कोश अंतरपटाच्या मागे असेल; आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल; याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन. 7 अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा; 8 पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळीत जावा. 10 अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्चित्तासाठी अर्पिलेल्या लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्चित्त करावे. ही वेदी परमेश्वराकरता परमपवित्र आहे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.