Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 31:1-6

OMRCV Marathi Contemporary Version

बसालेल आणि ओहोलियाब

1 मग याहवेह मोशेला म्हणाले, 2 "पाहा, मी यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे. 3 व मी त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे— 4 सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करण्यासाठी; 5 आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करण्यासाठी. 6 त्याचप्रमाणे, त्याला मदत करण्यासाठी दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब याला मी नेमले आहे.

"सर्व कुशल कामगारांना मी क्षमता दिली आहे, जेणेकरून तुला आज्ञापिलेले सर्वकाही त्यांनी करावे:

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    1 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला 2 "पाहा, यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल याला मी निवडून घेतले आहे. 3 देवाच्या आत्म्याने त्यास परिपूर्ण भरले आहे; आणि सर्व प्रकारची कामे करण्यासाठी मी त्यास अक्कल, बुद्धी व ज्ञान ही दिली आहेत. 4 तो सोने, चांदी व पितळ यांच्या कलाकुसरीचे काम करील. 5 तो रत्नांना सुंदर पैलू पाडील व हिरे जडवून देईल; तो लाकडावरील कोरीव कामही करील; आणि अशा सर्व प्रकारची कलाकुसरीची कामे करील. 6 त्याच्याबरोबर काम करण्याकरता दान याच्या वंशातील अहिसामाखाचा मुलगा अहलियाब यालाही मी निवडले आहे; एवढेच नव्हे तर जेवढे म्हणून बुध्दिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुध्दी ठेवली आहे. ती यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्व गोष्टी तयार कराव्या.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.